
चिपळूण खडपोली औद्योगिक वसाहतीतील साफयिस्ट कंपनीत स्टेनलेसस्टील पाईपची चोरी प्रकरणी गुन्हा दाखल
चिपळूण खडपोली औद्योगिक वसाहतीतील साफयिस्ट कंपनीत स्टेनलेसस्टील पाईपची चोरी झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हैदरअली शहा (वय ४०, सती चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या विषयीची फिर्याद कंपनीचा सुरक्षारक्षक महेश जाधव (५०, रा. सोनारवाडी, अलोरे) यांनी दिली आहे. त्यानुसार कंपनीच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत ६ हजार रुपये किमतीचा स्टेनलेसस्टील पाईप ठेवला होता. तो हैदरअली शहाकडे मिळून आला.




