
प्रवाशांच्या सोयीसाठी रत्नागिरी, थिवी आणि उडुपी या रेल्वेस्थानकांवर ’डिजी लॉकर’ सुविधा उपलब्ध होणार
रत्नागिरी, थिवी आणि उडुपी रेल्वेस्थानकांवर डिजी लॉकर सुविधा कार्यान्वित झाली आहे. यामुळे सामान ठेवण्यासाठी प्रवाशांची मोठी सोय झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. या सुविधेअंतर्गत प्रवासी यूपीआय, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आणि इतर डिजिटल पद्धती वापरून आधुनिक क्यू आर आधारित डिजिटल पेमेंट सिस्टमद्वारे त्यांचे सामान सोयीस्कर आणि सुरक्षितपणे ठेवू शकणार आहेत.
ही सुविधा २४ तास कार्यरत राहणार असल्याने प्रवाशांना सुलभता मिळणार आहे. भारत सरकारच्या डिजिटल इंडिया चळवळी अंतर्गत डिजिटली सक्षम सार्वजनिक वाहतूक प्रणालीच्या दृष्टिकोनात ही सेवा महत्त्वपूर्ण योगदान देणारी ठरणार आहे. याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
www.konkantoday.com




