
नवले पूल अपघातातील ९ मृतां नावे समोर एकच घरातील चार व्यक्ती दगावली!
वाहन चालवताना संयम राखणं फार महत्त्वाचं असतं. पण रस्त्यावरील वाहतूक कोंडी, नियम धाब्यावर ठेवत बेदरकारपणे वाहनं चालवणारे अशा अनेक गोष्टींमुळे हा संयम सुटत असतो. संयम सुटल्यानंतर अनेकदा चालक कायदा हातात घेतात आणि त्यातून अघटीत घटना घडतात.
नवले पुलावर काल गुरुवारी (दि. १३) सायंकाळी भीषण अपघात झाला. सातत्याने अपघातांमुळे चर्चेत असलेल्या या पुलावर एका भरधाव कंटेनरने सुमारे २० वाहनांना धडक दिल्याने मोठी दुर्घटना घडली.
या घटनेत ९ जणांचा अक्षरशः होरपळून मृत्यू झाला असून, २२ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतांची नावे
स्वाती संतोष नवलकर (37), शांता दत्तात्रय दाभाडे (54), दत्तात्रय चंद्रकांत दाभाडे (58), मोक्षिता हेमकुमार रेड्डी (3), कारचालक धनंजय कुमार कोळी (30), रोहित ज्ञानेश्वर कदम (25) अशी मृतांची नावे आहेत. अन्य दोघांची ओळख पटू शकली नाही.
मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत
अपघातातील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली.
जखमींची नावे
१. सोफिया अमजद सय्यद (वय १५ वर्ष), व्यवसाय शिक्षण, राहणार रुपीनगर निगडी पुणे
२. रुकसाना इब्राहिम बुरान (वय ४५ वर्ष), व्यवसाय गृहिणी
३. बिस्मिल्ला सय्यद (वय ३८ वर्ष), व्यवसाय गृहिणी, राहणार खंडोबा माळ चाकण पुणे
४. इस्माईल अब्बास बुरान (वय ५२ वर्ष), व्यवसाय मजुरी, राहणार रुपीनगर निगडी पुणे
५. अमोल मुळे (वय ४६ वर्ष), राहणार काळेवाडी फाटा
६. संतोष सुर्वे (वय ४५ वर्ष), राहणार भूमकर नगर नरे
- नवले हॉस्पिटल येथील पेशंट बाबत माहिती
१. सय्यद शालीमा सय्यद
२. जुलेखा अमजद सय्यद (वय ३२ वर्ष)
३. अमजद सय्यद (वय ४० वर्ष), राहणार भक्ती शक्ती रोड, निगडी पुणे
४. सतीश वाघमारे (वय ३५ वर्ष), राहणार शिरूर खांदाड नांदेड
५. सोहेल रमनुद्दीन सय्यद (वय २० वर्ष), राहणार निकोडो चाकण पुणे
६. शामराव पोटे (वय ७९ वर्ष), राहणार फ्लॅट नंबर ७०१ हिंजवडी पुणे
- अडवांटेज हॉस्पिटल मार्केट यार्ड
१. अंकित सलीयन (वय ३० वर्ष), राहणार तारा वेस्ट आंबेगाव बुद्रुक पुणे
- सिल्वर बर्च हॉस्पिटल भूमकर चौक
१. रोहित ज्ञानेश्वर कदम (वय २५ वर्ष), राहणार लोणी, तालुका खंडाळा जिल्हा सातारा हे मयत झाले आहे.
वाहन चालवताना संयम राखणं फार महत्त्वाचं असतं. पण रस्त्यावरील वाहतूक कोंडी, नियम धाब्यावर ठेवत बेदरकारपणे वाहनं चालवणारे अशा अनेक गोष्टींमुळे हा संयम सुटत असतो. संयम सुटल्यानंतर अनेकदा चालक कायदा हातात घेतात आणि त्यातून अघटीत घटना घडतात.




