गावखडी ते अक्कलकोट मनोरथपूर्ती महापदयात्रेला २१ नोव्हेंबरपासून प्रारंभ

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथून भक्तगणांचे मनोरथ सिद्ध करणारी श्री क्षेत्र गावखडी ते श्री क्षेत्रअक्कलकोट मनोरथपूर्ती महापदयात्रा प्रतिवर्षी प्रमाणे श्री स्वामी समर्थ मठ, गावखडी मठाधिपती श्री गुरुदेव दास दिगंबर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र गावखडी ते श्री क्षेत्र अक्कलकोट २१ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. पदयात्रचे हे २० वे वर्ष आहे.
पदयात्रा मार्गक्रमणा अशी असेल : २१ नोव्हेंबर – गावखडी मठ येथून दुपारी ४ वाजता प्रारंभ. निवास – गोळप, २२ नोव्हेंबर – रत्नागिरी, हातखंबा. २३ नोव्हेंबर – नाणीज, करंजारी, २४ नोव्हेंबर – दाभोळे, साखरपा. २५ नोव्हेंबर – आंबा, मलकापूर. २६ नोव्हेंबर- बांबवडे, पैजारवाडी. २७ नोव्हेंबर – कोल्हापूर (पंचगंगा नदी घाट), मार्केट यार्ड, कोल्हापूर. २८ नोव्हेंबर – हातकणंगले, निमशिरगाव. २९ नोव्हेंबर – मिरज, भोसेगाव. ३० नोव्हेंबर – कुची, शेळकेवाडी. १ डिसेंबर- जुनोनी, उदनवाडी. २ डिसेंबर- सांगोला, आंधळगाव. ३ डिसेंबर- गणेशवाडी, माचणूर. ४ डिसेंबर- सोहाळे, कामती खुर्द. ५ डिसेंबर- तीऱ्हे, सोलापूर. ६ डिसेंबर- कुंभारी, तोगराळी. ७ डिसेंबर- कोन्हाळी, कोन्हाळी. ८ डिसेंबर- अक्कलकोट.
९ डिसेंबर- गावखडी सांयकाळी.
१० डिसेंबर रोजी श्री स्वामी समर्थ मठ गावखडी येथे श्री स्वामी पादुकांना मंगलस्नान, पुजन, महाआरती, महाप्रसाद हा सोहळा संपन्न होईल.
या पदयात्रेमध्ये प्रवेश व सहभाग विनामूल्य आहे. इच्छुक श्री स्वामीभक्तांनी पदयात्रेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ, गावखडी यांच्याकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button