
राजापुरात नगराध्यक्ष निवडणुकीसाठी पहिला अर्ज दाखल!
राजापूर : राजापूर नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष निवडणुकीसाठी एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. हा उमेदवारी अर्ज ज्योती सुनील खटावकर, अपक्ष ( हिंदू महासभा) यांच्यावतीने दाखल करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त दुसऱ्या दिवशी अन्य अर्ज दाखल झालेले नाहीत.
राजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे. पहिल्या दिवशी नगरसेवक अथवा नगराध्यक्ष पदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. दुसऱ्या दिवशी केवळ नगराध्यक्ष निवडणुकीसाठी एक अर्ज आला. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील चर्चा अजूनही सुरूच असल्याने उमेदवारी याद्या जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे अजूनही कोणाचे अर्ज आलेले नाहीत. येत्या एक दोन दिवसात ही नावे जाहीर होणे अपेक्षित आहे.




