
रत्नागिरी शहरातील मांडवी भुतेनाका येथे कोयत्याने हल्ला करणार्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी
रत्नागिरी शहरातील मांडवी भुतेनाका येथे दुचाकीवरील तरुणावर कोयत्याने हल्ला करणार्या संशयिताला न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अंकुश मांडवकर (रा. भुतेनाका, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास अंकुश हा कोयता घेवून भुतेनाका येथे रस्त्यावर आला होता. यावेळी त्याने दुचाकीवरील तरुणावर कोयत्याने हल्ला केला होता. या प्रकरणी पोलिसांकडून अंकुशला अटक करण्यात आली होती.
अरमान इनामदार (२९, रा. मिरकरवाडा) असे हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. शहर पोलिसांकडून अंकुशवर ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच मंगळवारी त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. अंकुशने हल्ला नेमका कोणत्या कारणातून केला. हल्ला करण्यासाठी त्याने कोयता कोणाकडून आणला, याचा तपास करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी न्यायालयापुढे सांगितले.
www.konkantoday.com



