
उद्धव ठाकरेंसमोर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत युतीचा प्रस्ताव,उद्धव ठाकरेंची यावर तीव्र नाराजी
सिंधुदुर्ग मधील कणकवली नगरपंचायत निवडणुकीत पक्षाने शिंदेंच्या शिवसेनेसोबत जावं असा प्रस्ताव उद्धव ठाकरेंसमोर ठेवण्यात आला. स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव ठेवला. मात्र या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.सिंधुदुर्गमधील कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शहर विकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या समीकरणाची माहिती घेतल्यानंतरही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.भाजपाला शह देण्यासाठी कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं आणि त्यासंबंधी स्थानिक पातळीवर चर्चा केल्याची संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आली. शिवाय ही शहर विकास आघाडी का महत्त्वाची आहे यासंबंधी सुद्धा माहिती संदेश पारकर वैभव नाईक व इतर पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली. मात्र याबाबत कुठलाही निर्णय न देता उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे.




