
देवळातून कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या दुचाकी स्वारांची दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील खरवते येथील तीव्र उतारातील वळणावर देवळातून कार्यक्रम आटोपून येणाऱ्या दुचाकी स्वारांची दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या इसमाचा जागीच मृत्यू झाला. संजय सखाराम सनगरे (, रा. कोतवडे, रत्नागिरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. अपघाताची ही घटना मंगळवारी (ता. ११) सकाळी साडेदहाच्या सुमारास खरवते रस्त्यावरील तीव्र उतारातील वळणावर घडली.
मंगळवारी सकाळी सुर्यकांत जयदेव वारेकर (५०, रा. कोतवडे, रत्नागिरी) हे संजय सनगरे यांच्या सोबत कोतवडे येथील महालक्ष्मी मंदिरात देवभेटणेचा कार्यक्रम आटोपल्यावर आपल्या ताब्यातील दुचाकी (क्र. एमएच-०८ बीए-०७०६) वर पाठीमागे संजय सनगरे यांना बसवून खरवते येथे जात होते. ते खरवत येथील तीव्र उतारातील वळणावर आले असता सुर्यकांत वारेकर यांचा दुचाकीवारील ताबा सूटला. त्यामुळे दुचाकी घसरुन २० फुट दरीत कोसळली या अपघातामध्ये संजय सनगरे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.




