
रत्नागिरी जिल्ह्यात सततच्या वातावरण बदलामुळे साथीच्या रोगांचे प्रमाण वाढले..
रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पाऊस थांबल्यानंतर वातावरणात बदल होत आहे. दिवसा कडक उन्ह तर सायंकाळी गरज, पहाटे थंडी होत आहे. सततच्या वातावरण बदलामुळे साथीच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, घशात खवखव यासह विविध साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे.
साथीच्या आजारामुळे जिल्हा रुग्णालये, शासकीय, खासगी दवाखान्यात रूग्णांची गर्दी वाढत आहे. नागरिकांनी आरोग्याचे काळजी घ्यावी असेही आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळा ऋतुत पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात वातारणात सतत बदल होत गेले. त्यामुळे साथींच्या आजारांचे प्रमाण वाढतच आहेत.




