
खेड जि. प. गट व पंचायत समिती अंतिम मतदार यादीनागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध
रत्नागिरी, दि. 11 ):- खेड तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निहाय अंतिम मतदार यादी 3 नोव्हेंबर 2025 पासून तहसिलदार कार्यालय, खेड व पंचायत समिती कार्यालय, खेड येथे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन ठेवण्यात आलेल्या आहेत, असे तहसिलदार सुधीर सोनवणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडील 23 सप्टेंबर 2025 रोजीच्या पत्रान्वये जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूककामी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमांतर्गत 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली होती. सदरच्या यादीवर प्राप्त हरकती विचारात घेवून 3 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने सूचना दिलेली आहे.




