रक्तदाबाची मर्यादा आता १२०/८० मिमी एचजी; ‘अमेरिकन कॉर्डिओलॉजी’चे सर्वेक्षण; आजारांचे निदान होण्यासाठी होणार मदत


अमेरिकन कॉर्डिओलॉजी संघटनेने केलेल्या सर्वेक्षणातून आढळून आलेल्या निरीक्षणांनुसार उच्च रक्तदाबाचे आता निकष बदलण्यात आले आहेत. यापूर्वी सिस्टोलिक (वरचा) १४० तर डायस्टोलिक (खालचा) ९० मिमी एचजी रक्तदाब सामान्य मानला जात होता.मात्र ८० पेक्षा जास्त रक्तदाब असताना अनेकदा हृदयविकार, पक्षाघाताचे रुग्ण आढळल्याने निकष बदलून आता सिस्टोलिक १२० तर डायस्टोलिक ८० म्हणजे १२०/८० मिमी एचजी असा असणार आहे. यामुळे आजारांचे निदान करणे सोपे होणार आहे.

दोन प्रकारच्या परिमाणांद्वारे रक्तदाब मोजला जातो. सध्याच्या वैद्यकीय पद्धतीने रक्तदाब हा १४०/९० पर्यंतचा रक्तदाब सामान्य मानला जात होता. पण यापुढे १२०/८० पेक्षा कमी असलेला रक्तदाब सामान्य समजला जाणार आहे. अमेरिकन कार्डिऑलॉजी असोसिएशनने उच्च रक्तदाबाबाबत निकषत बदल सुचवला आहे.

त्यानुसार सामान्य रक्तदाब १२०/८० सामान्य मानला जाणार आहे. या पातळीमध्ये छोटा बदल देखील तत्काळ हृदयरोग, पक्षाघात, किडनी विषयक आजारांची पूर्वसूचना देणारा ठरणार आहे. हा बदल उपचारासाठी उपयुक्त ठरून, भविष्यातील संभाव्य आजारांचा धोका ओळखता येणार आहे. आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी मदत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button