
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या वर्धापनदिनी रत्नागिरीत अंबरग्रीसवर कार्यशाळा
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचा वर्धापनदिन ११ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त केंद्राला भेट देणार्या मत्स्य व्यावसायिक आणि वन विभागातील अधिकार्यांसाठी अंबरग्रीस विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
अंबरग्रीस जनजागृतीसाठी Brain5storming on mbergris या विषयावर ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० पर्यंत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या विचार मंथन सभेमध्ये सुमारे २५ शास्त्रज्ञ, मत्स्य व्यावसायिक, वन विभागाचे अधिकारी, युएनडीपी प्रकल्पाचे अधिकारी, मान्यवर संस्थांचे अधिकारी सहभागी होतील.
व्यावसायिक बाजारपेठेत या अंबरग्रीसला मोठी किंमत आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत अंबरग्रीस संरक्षित असली तरी इंग्लंड, न्यूझीलंड, फ्रांस इत्यादी देशामध्ये व्हेल संरक्षित असून अंबर ग्रीस संरक्षित नाही.www.konkantoday.com




