
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात कारमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात सोमवारी संध्याकाळी कारमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली असून या घटनेनं दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.स्फोटात काही जण जखमी झाले असून स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. दिल्ली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली आहे.




