केळंबे येथे बिबट्या आढळला जखमी अवस्थेत

लांजा : तालुक्यातील केळंबे – सुधा विष्णुनगरमध्ये बिबट्या जखमी अवस्थेत सापडला. मागचे दोन्ही पाय अशक्त असून, पुढील उपचारासाठी वन विभागामार्फत त्याला पुणे येथे पाठविण्यात आले आहे.


याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास केळंबे येथील सुधा विष्णुनगर येथे श्री. बावनाधकर यांच्या प्लॉटिंगमध्ये बिबट्या जखमी अवस्थेत असल्याची माहिती संपत खानविलकर यांनी वनविभागाला दिली. वनविभागाने तत्काळ घटनास्थळी पोचत लोखंडी पिंजऱ्यामध्ये सुरक्षितरित्या जेरबंद केले. त्यानंतर त्याची लांजाचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राथमिक तपासणी करण्यात आली. वय अंदाजे २ वर्षे असलेला बिबट्या मादी जातीचा आहे. त्याचे मागील दोन्ही पाय कमकुवत असल्याचा खुलासा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला. या जखमी बिबट्यावर लांजा येथे उपचार करणे शक्य नसल्याने पुढील उपचारासाठी त्याला पुण्यात पाठविण्यात आले.
दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच लांजा-राजापूर-साखरपाचे आमदार किरण (भैय्या) सामंत, यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन जखमी बिबट्याची पाहणी केली. तसेच त्याच्यावर तत्काळ उपचार करण्याच्या सूचना दिल्या. रत्नागिरीच्या (चिपळूण) विभागीय वन अधिकारी गिरीजा गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनानुसार बिबट्यावर उपचार करण्यासाठी पुणे येथे पाठविण्यात आले.
वन्यजीव बचाव कार्यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी (रत्नागिरी) प्रकाश सुतार, वनपाल (लांजा) सारीक फकीर, वनरक्षक (कोर्ले) बाबासाहेब ढेकळे, वनरक्षक (लांजा) नमिता कांबळे, वनमजूर (लांजा) संजय गोसावी, सत्यवान गुरव, लांजा पोलीस नासिर नवलेकर, नितेश राणे, दीप्ती शेटकर, पांडुरंग साळुंखे, राजेश झोरे, सुनील कानडे, महेश लांजेकर, सुधाकर झोरे, बशीर लांजेकर, केपूर साळुंखे आदी ग्रामस्थ सहभागी होते.
अशा प्रकारच्या घटना घडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button