
रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीने ६२४ रस्ते, साकव, पुलांचे नुकसान
गेल्या काही महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने रत्नागिरी जिल्ह्याच्या दळणवळण व्यवस्थेची दाणादाण उडवली आहे. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेल्या प्राथमिक अहवालानुसार, जिल्ह्याचे तब्बल १६ कोटी ५० लाख – रुपयांचे नुकसान झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यातील ६२४ रस्ते, साकव आणि मोठे पूल बाधित झाले आहेत.
या झालेल्या नुकसानीत दळणवळणाच्या मूलभूत साधनांना मोठा फटका बसला आहे. या रस्त्यांवर खड्डे पडणे, संरक्षक भिंती कोसळणे किंवा काही ठिकाणी रस्ते पूर्णपणे वाहून जाणे अशा घटना घडल्या आहेत. रस्त्यांप्रमाणेच, ग्रामीण भागाला मुख्य मार्गाशी जोडणारे १०८ साकव देखील उद्ध्वस्त झाले आहेत.
www.konkantoday.com




