
राजापूर तालुक्यातील ओणी-कासारवाडी येथे पूर्ववैमनस्यातून भाच्याकडून मावशीवर जीवघेणा हल्ला
पतीसोबत असलेल्या जुन्या वादातून भाच्याने आपल्या मावशीवर लोखंडी पहारीच्या सहाय्याने हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना राजापूर तालुक्यातील ओणी कासारवाडी येथे घडली. ४ नोव्हेंबर रोजी – रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. यात प्रमिला पांडुरंग बावकर (४०, ओणी-कासारवाडी) या गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणी सुनील लक्ष्मण माळी याच्याविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओणी कासारवाडी येथे राहणार्या प्रमिला पांडुरंग बावकर यांचे पती आणि संशयित आरोपी सुनील माळी यांच्यात काही जुने वाद होते.
सुनील हा प्रमिला यांचा भाचा आहे. त्याने पूर्वीच्या वैमनस्यातून ४ नोव्हेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास प्रमिला बावकर यांच्या राहत्या घरी गेला. त्यावेळी त्याने लोखंडी पहारीच्या सहाय्याने प्रमिला बावकर यांच्या डोक्यावर मारहाण केली. या अनपेक्षित व प्राणघातक हल्ल्यात प्रमिला यांना गंभीर दुखापत झाली आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. घटनेनंतर जखमी प्रमिला यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.www.konkantoday.com




