
शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात रत्नागिरीतील आंबा उत्पादक शेतकर्यांचा संताप
शासनाच्याल उदासीन धोरणाविरोधात रत्नागिरीतील आंबा उत्पादक शेतकर्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या ५ मे पासून झालेला आणि अद्यापही न थांबलेला अवकाळी पावसाने इतर शेती पीकांबरोबरच हापूस आंबा हंगाम पूर्णपणे धोक्यात आला आहे. हंगामाला प्रारंभ व मोहोराबरोबरच नवीन पालवी फुटण्याच्या काळातच या पावसामुळे तुडतुडा आणि थ्रिप्सच्या झालेल्या मोठ्या प्रादुर्भावाने हंगाम वाया जाण्याचे गंभीर संकट उभे आहे. याचा शासनाने योग्य विचार करून न्याय द्यावा, अशी मागणी येथील आंबा उत्पादक शेतकर्यांनी पत्रकार परिषदेत केला.
रत्नागिरीत मंगळवारी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेला जिल्हा हापूस आंबा उत्पादक संघ, पावस परिसर आंबा उत्पादक संघ, मंगलमुर्ती आंबा उत्पादक संघ आडिवरे, रवळनाथ आंबा उत्पादक संघ करबुडे यांसह अन्य सामाजिक व मच्छी उत्पादक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यात प्रकाश साळवी, टी. एस. घवाळी, दीपक उपळेकर, अशोक भाटकर, राजेंद्र कदम, रामचंद्र मोहिते, सदाशिव पाचकुडे, शोएब काझी, नितीन पाचकुडे, अनिल शेलार, अरूण मांडवकर, अनंत आग्रे यांसह अनेक प्रमुख सदस्य उपस्थित होते.www.konkantoday.com




