
कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा बुडून मृत्यू
संगमेश्वर तालुक्यातील चिखली पंडववाडी येथील पर्याच्या ठिकाणी कपडे धुण्यासाठी गेलेली अनिता रमेश डिंगणकर (३८, मु. पो. चिखली, पंडववाडी, संगमेश्वर) ही महिला पर्यावर कपडे धुण्यासाठी गेली होती. त्यावेळी ती बेशुद्धावस्थेत पाण्यात आढळून आली. आजुबाजूच्या ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी तिला ग्रामीण रूग्णालयात दाखल केले परंतु तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी तिला मृत घोषित केले.
www.konkantoday.com




