
देवरूख शहरात चोर्यांच्या प्रकारात वाढ मात्र कांजिवरा व साडवली या ठिकाणची सीसीटीव्ही यंत्रणा बंद
देवरूख शहरातील कांजिवरा व साडवली सह्याद्रीनगर येथे उभारण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा गेली वर्षभर बंद असून केवळ शोभेचे बाहुले बनले आहेत. आमदार शेखर निकम यांनी सीसीटीव्ही यंत्रणेसाठी ३३ लाखाचा निधी मंजूर केला आहे. मात्र ही यंत्रणा काही महिन्यातच कोलमडल्याने याचा फटका नागरिकांना बसत आहे.
देवरूख हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. दोन तीन वर्षापूर्वी देवरूख व परिसरात चोरीचे प्रमाण वाढले होते. देवरूख पोलिसांच्या पुढाकाराने व नागरिकांच्या सहकार्याने गजबजलेल्या ठिकाणी म्हणजे कांजिवरा, साडवली सह्याद्रीनगर येथे भव्य दिव्य सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. मात्र काही महिन्यातच ही यंत्रणा कोलमडली. ही यंत्रणा सुरू व्हावी यासाठी नागरिकांनी संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा गेला. मात्र दुरूस्तीचा खर्च करायचा कोणी हा प्रश्न असल्याने गेली वर्षभर ही यंत्रणा धुळखात आहे. केवळ उन, वारा, पाऊस याचा सामना करत आहे.
www.konkantoday.com




