
चिपळूण नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांची पत्रकार परिषद
चिपळूण : चिपळूण नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासन तयारीला लागले असून, एकूण ४२,५८२ मतदार मतदान करणार आहेत. यापैकी २१,५९६ महिला मतदारांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
२६ नोव्हेंबर रोजी चिन्हवाटपानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. ३० नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजता प्रचार संपेल; मात्र त्याच दिवशी रात्री १० नंतर जाहीर प्रचार बंद असेल. प्रार्थना स्थळांचा प्रचारासाठी वापर करता येणार नाही तसेच प्रचार साहित्यावर मुद्रक-प्रकाशकाचा तपशील अनिवार्य राहील. सोशल मीडियावरील प्रचारही ३० नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे.
प्राणी-पक्षी आणि १४ वर्षांखालील मुलांना प्रचारात सहभागी करता येणार नाही. ध्वनिक्षेपकाचा वापर रात्री १० वाजेपर्यंतच करण्यास परवानगी आहे.
थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठी ११.२५ लाख, तर नगरसेवक उमेदवारांसाठी ३.५० लाख इतकी खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. १, २ व ३ डिसेंबर रोजी मद्यविक्री विक्री बंद राहील. मतदानानंतर मतमोजणी युनायटेड हायस्कूलमध्ये सकाळी १० वाजता सुरू होईल, असेही लिगाडे यांनी स्पष्ट केले.




