
खेड शहरातील स्व.मीनाताई ठाकरे नाट्यगृहात नाटक प्रयोगाच्या दरम्याने एसी बंद पडल्याने रसिकांच्यात नाराजी
खेड शहरातील स्व.मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या उभारणीवर साडेअकरा कोटी रुपये खर्चुन अत्याधुनिक अन् वातानुकूलित नाट्यगृह रसिकांच्या सेवेत दाखल झाले. लोकार्पणानंतर सलग तिसर्या महिन्यात नाटकाच्या पहिल्या प्रयोगादरम्यान एसीसह जनरेटर सुविधा बंद पडल्याने प्रेक्षकांचा संताप अनावर झाला. वातानुकूलित यंत्रणेसह जनरेटरची सुविधा हाताळण्यास तंत्रज्ञच नसल्याची बाब समोर आली आहे.
शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मुहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नाट्यगृहाच्या पुनर्बाधणीसाठी तब्बल साडेअकरा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देत सर्व सोयी-सुविधांयुक्त नाट्यगृहाचे दालन रसिकांच्या सेवेसाठी खुले झाले. झाले. नाव नाट्यगृहाच्या लोकार्पणानंतर रसिकांना नाटकांच्या प्रयोगांची प्रतीक्षा करावी लागली होती. २ नोव्हेंबर रोजी अभिनेता भाऊ कदम यांची प्रमुख भूमिका असलेल्या ’सिरियल किलर’ हा पहिलावहिला नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी खेडवासियांनी हाऊसफुल्ल गर्दी केली होती. मात्र या प्रयोगादरम्यान सार्यांचाच भ्रमनिरास झाला. वातानुकूलित तिकीट दरापोटीचे भाडे आकारुनही वातानुकूलित यंत्रणाच तांत्रिक कारणामुळे बंद पडल्याने रसिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. वातानुकूलित मशिनसह जनरेटर हाताळण्यास तंत्रज्ञच नसल्याची बाब यानिमित्ताने समोर आली.www.konkantoday.com




