
चिपळूणमधील एटीएममध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक
चिपळूण शहरातील डीबीजे महाविद्यालया जवळील अर्बन बँकेचे एटीएम फोडून चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्याला चोरट्यांना पोलिसांनी अटक केले आहे. विष्णू डिंगणकर राहणार मुंबई सांताक्रूझ असे अटक केलेल्या चोरटय़ाचे नाव आहे.चोरीचा प्रयत्न करताना चोरटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला होता.त्याच्या आधारे पोलिसांनी तपास करून त्याला मुंबई येथून अटक केली.
www.konkantoday.com