
वारकरी गुरुकुल प्रकरणात दाखल पोक्सो गुन्ह्यातील संशयित आरोपी भगवान कोकरे महाराज आणि शिक्षक प्रितेश कदम या दोघांना जामीन मंजूर
लोटे येथील वारकरी गुरुकुल प्रकरणात दाखल पोक्सो गुन्ह्यातील संशयित आरोपी भगवान कोकरे महाराज आणि शिक्षक प्रितेश कदम या दोघांना खेड न्यायालयाने गुरुवारी (दि.६) जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणात दोघांना दि.१४ ऑक्टोबर रोजी खेड पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. गुरुवारी झालेल्या सुनावणीत संशयित भगवान कोकरे महाराज यांच्या वतीने ऍड. मिलिंद जाडकर, तर संशयित प्रितेश कदम यांच्या वतीने ऍड. भारत सोनुले यांनी जामीनासाठी युक्तिवाद केला.
सरकारी पक्षाने दोघांच्या जामिनास तीव्र विरोध दर्शवून आपले मुद्दे मांडले. मात्र दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन्ही संशयितांना जामीन मंजूर करण्याचा निर्णय दिला. लोटे येथील वारकरी गुरुकुलात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या तक्रारीनंतर कोकरे महाराज आणि प्रितेश कदम यांच्यावर पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.




