
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे बंद असलेली रेल्वे वाहतूक अचानक सुरू झाल्याने रुळावरून जाणाऱ्या तिघा प्रवाशांचा मृत्यू
मुंबई शहरात काल अचानक सायंकाळच्या सुमारास केलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे रेल्वे स्थानकांत प्रचंड गर्दी झाली होती. याचा परिणाम म्हणून सीएसएमटी येथून मस्जिद बंदर, सॅडहर्स्ट रोड येथे रुळातून चालत जात असताना सॅडहर्स्ट रोड येथे पाठीमागून येणाऱ्या ट्रेनच्या धडकेत तीन प्रवाशांचा मृत्यू झाला तर एक प्रवासी गंभीररित्या जखमी आहे.दरम्यान, मुंब्रा दुर्घटना प्रकरणी रेल्वे पोलिसांनी मध्य रेल्वेच्या दोन इंजिनिअर विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या निषेधार्थ मुंबई, सीएसएमटी येथे रेल्वे कर्मचारी युनियनकडून गुरुवार, ०६ नोव्हेंबरला सायंकाळी रेल रोको आंदोलन करण्यात आले होते.
दरम्यान, यामध्ये NRUM कडून ०६ नोव्हेंबरला संध्याकाळी मोर्चा काढण्यात आला, त्यानंतर लोकल देखील सोडण्यात आल्या नाहीत, मोटर मन देखील यात सहभागी झाले आहेत. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सीएसएमटी स्थानकात उभ्या आहेत. रेल्वे प्रशासनाचे रेल्वे युनियन सोबत बोलणे सुरू असून लोकल सोडण्यात याव्या, यासंदर्भात चर्चा सुरू आहेत.
रेल्वे कर्मचारी संघटना नेहमीच प्रवाशांना वेठीस धरतात, मोटर मानची चूक असेल आणि प्रशासनाने कारवाई केली तरी आंदोलन करतात, लोकल बंद करण्याची धमकी देतात, आज देखील तेच झाले, लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे अभियंत्यांवर गुन्हा दाखल केल्याने आज आंदोलन केले आणि अचानक लोकल बंद केल्या, याचा फटका लाखो प्रवाशांना बसला, रेल्वे कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करायचेच नाहीत असा या रेल्वे युनियनचा पवित्रा असतो.




