
राज्यात भाजपचे प्रभारी जाहीर; रत्नागिरीची जबाबदारी आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने बुधवारी जिल्हानिहाय प्रभारींची घोषणा केली. नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महापालिका या तिन्ही स्तरांवरील निवडणुकांचे नियोजन, समन्वय आणि रणनीती यासाठी हे प्रभारी जबाबदार राहणार आहेत.
मुंबईचे प्रभारी म्हणून मंत्री आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्याची महत्त्वाची जबाबदारी आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
.




