
कोकण मार्गावरून धावणार्या तेजस एक्स्प्रेसमधील प्रवाशांना नाश्त्याऐवजी बिस्कीट पुडा
कोकण मार्गावर तेजस एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्या प्रवाशांना नाश्ताऐवजी १० रुपयांचा बिस्कीट पुडा देण्यात आला. याबाबत संबंधित प्रवाशांनी रेल्वेच्या ’पीजी पोर्टल’वर तक्रार दाखल केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कोकणातून मुंबईला जाण्यासाठी श्रेयस पटवर्धन यांनी तेजस एक्स्प्रेसचे आरक्षण केले होते. त्यानुसार कुडाळ स्थानकात त्यांनी प्रवेश केला. मुंबईच्या दिशेने गाडी रवाना झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास नाश्त्याचे वितरण सुरू झाले. ’आयआरसीटी’ मार्फत जाहीर झालेल्या नाश्त्याच्या पदार्थांमध्ये एक कचोरी, समोसा, व्हेज सॅन्डविचचा समावेश अपेक्षित होता. तसेच प्रिमिक्ससह चहा, कॉफी, कॅरमल पॉपकॉर्न, पॅकेज डिंक यांचाही समावेश होता. मात्र प्रत्यक्षात प्रवाशांना नाश्त्याऐवजी चक्क १० रुपयांचा बिस्कीट पुडा, एक कीट मसाला शेंगदाणे, एक शीतपेय, एक डीप चहा देण्यात आला या प्रकाराबाबत पटवर्धन यांनी तक्रार केल्यानंतर एक्सप्रेसमध्ये नाष्टा कमी प्रमाणात आल्याने बिस्कीट देण्यात आल्याचे व्यवस्थापकाने स्पष्ट केले,
www.konkantoday.com




