
रत्नागिरी जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना अद्यापही थकलेले कमिशन मिळाले नाही.
रत्नागिरी जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन अद्यापही ना मिळाल्याने त्यांची दिवाळी कडू झाली आहे. यामुळे दुकानदार नाराज असून लवकरच पालकमंत्री उदय सामंत यांसह मुरवठा विभागाला निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा रेशनिंग केरोसीन चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, शासन शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या हक्काचे देत असलेले धान्य वाटण्याचे काम जिल्ह्यातील रेशन दुकानदार प्रामाणिकपणे करीत आहेत. ते करीत असताना शासनाच्या अनेक अटींची पूर्तताही केली जात आहे असे असताना याच दुकानदारांना त्यांच्या कष्टाचे कमिशन वेळेत मिळत नाही. त्यामुळे दुकानदारांवर उपासमारीची वेळ येत आहे. १ हा प्रकार संघटनेच्या माध्यमातून आमदार शेखर निकम यांच्यासह लोकप्रतिनिधींपर्यंत पोहचवण्यात आला होता. त्यानुसार आमदार निकम यांनी पुढाकार घेत काही महिन्यांपूर्वी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घडवून आणलीद्रwww.konkantoday.com




