
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे रंगभूमी दिन साजरा
रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरी च्या वतीने आज रंगभूमी दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी कडवई तालुका संगमेश्वर येथील प्रख्यात अभिनेते डॉ. भगवान नारकर यांच्या हस्ते आणि नाट्य परिषद शाखा चिपळूणचे कार्यकारणी सदस्य आणि नाट्य व्यवस्थापक योगेश कुष्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत नटराज पूजन करण्यात आले.
यावेळी डॉ. नारकर यांनी अभिनेत्याने रंगभूमीची सेवा करत असताना शरीर स्वास्थ्य कसे जपावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी “चौकट राजा” या चित्रपटातील दिलीप प्रभावळकर यांच्या भूमिकेतील एक प्रसंग सादर केला.
यावेळी जेष्ठ रंगकर्मी आणि प्रकाशयोजनाकार विनय राज उपरकर, नामवंत अभिनेते दीपक कीर, योगेश सामंत, चंद्रशेखर आंबेरकर, विलास जाधव, नरेश पांचाळ, आणि नाट्य परिषद शाखा रत्नागिरीचे सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.




