
अनेक गुंतवणुकदारांची फसवणूक करणार्या आर्जू टेकसोलच्या मालमत्तेवर प्रशासनाचा कब्जा
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे एमआयडीसीमध्ये रोजगार आणि आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांना कोट्यावधींचा गंडा घालणार्या आर्जू टेकसोल प्रायव्हेट कंपनीचे अखेर दिवाळे निघाले आहे. कंपनीविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर आता शासनाने या प्रकरणाची सूत्रे हाती घेतली आहेत. जप्त मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांची सक्षम प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
फसवणुकीचा आकडा ७ कोटीच्या वर गेला असताना देसाई यांनी सोमवारी पोलिसांच्या उपस्थितीत कंपनीची जप्त मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे आर्जू कंपनीविरोधात तक्रारीची रिघ सुरूच आहे. आतापर्यंत ५८७ गुंतवणुकदारांनी तक्रारी दाखल केल्या ओत. फसवणुकीचा एकूण आकडा ७ कोटीहून अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे अगदी १० ते २० हजारांच्या परताव्यासाठीही गुंतवणुकदारांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.www.konkantoday.com




