
संगमेश्वर येथील नुतनीकरण केलेल्या बसस्थानकाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई-गोवा महामार्गावरील नव्याने उभारण्यात आलेल्या आधुनिक बसस्थानकाचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. केवळ १८ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण झालेले हे स्थानिक प्रवाशांसाठी सर्व सोयीसुविधांनी युक्त असून मजबूत आणि देखणे बांधकाम म्हणून ओळखले जात आहे.
या लोकार्पण सोहळ्यास आमदार शेखर निकम, रोहन बने, राहुल पंडित, प्रमोद पवार, म.औ.वि.म. मंडळाचे अधिकारी अभियंता, विभागीय नियंत्रक तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. या वेळी पालकमंत्री सामंत म्हणाले की, या स्थानकाच्या उभारणीचे खरे श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाते. प्रवासी व कर्मचारीवर्गाने हे स्थानक स्वच्छ व सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी घ्यावी. मी स्वतः वेळोवेळी येथे भेट देईन असे ते म्हणाले.
www.konkantoday.com




