
दापोली नगरपंचायतीतील रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

दापोली : महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या आस्थापनेवर सन २००० ते २००५ या कालावधीत रोजंदारी तत्वावर नियुक्त केलेल्या वर्ग ३ व वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयीन दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीला गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते.
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या आस्थापनेवर रोजंदारी तत्वावर नियुक्त कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत यापूर्वी झालेल्या निर्णयाबाबत माहिती घेऊन त्या निर्णयानुसार आवश्यक ती कार्यवाही सन २००० ते २००५ या कालावधीत नियुक्त केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत देखील करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत दिले आहेत.
या बैठकीस नगरविकास विभागाचे अधिकारी, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीम. व्ही. राधा, नगरपरिषद आणि नगरपंचायत अधिकारी, दापोली नगराध्यक्ष सौ. कृपा घाग, नगरसेवक तसेच रोजंदारी कर्मचारी उपस्थित होते.




