
खेड तालुक्यातील फुरूस येथे गुटखा जप्त, एकावर गुन्हा
खेड तालुक्यातील फुरूस येथे टेलरिंगच्या दुकानात बेकायदेशीरपणे गुटख्याची पाकिटे बाळगणार्या वाहिद अब्दुल कादिर परकार (५१, रा. फुरूस) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात रविवारी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून १०७२० रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. दापोली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पुजा हिरेमठ यांनी तक्रार नोंदवली. संशयिताने विमल नावाचा गुटखा हा नशाकारक असल्याचे आणि शरीरास अपायकारक असल्याचे माहित असूनही तो इतरांना सेवन करण्याकरिता देत विनापरवाना विक्रीसाठी बाळगल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
www.konkantoday.com




