
रत्नागिरीत ५ नोव्हेंबरला साजरा होणार मराठी रंगभूमी दिन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे आयोजन
रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता मराठी रंगभूमी दिन साजरा होणार आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह येथील शाखेच्या कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमात नटराज पूजनानंतर नाट्य वाचन केले जाईल.
प्रतिवर्षी वि. दा. सावरकर नाट्यगृहाच्या पायऱ्यांवर सादर होणारा हा कार्यक्रम पावसाच्या अनिश्चिततेमुळे साधेपणाने शाखेच्या कार्यालयात साजरा होणार आहे. इच्छुकांनी आणि रंगकर्मी यांनी याप्रसंगी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांनी केले आहे.




