
देशातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला दिशा देण्यासाठी सागरी मत्स्य जनगणना २०२५ चा होतोय प्रारंभ
देशातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला दिशा देण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाने भारतीय कृषी संशोधन परिषद व केंद्रीय सागरी मत्स्यिकी संशोधन संस्था आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने पाचवी सागरी मत्स्य जनगणना २०२५ ला प्रारंभ होणार आहे. ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षी आणि व्यापक मोहीम आहे. ही मोहीम ३ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत राबवली जाणार आहे.
या सागरी मत्स्यिकी जनगणनेचे उद्दिष्ट केवळ आकडेवारी गोळा करण्यापुरते मर्यादित नाही तर मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या विकास नियोजनासाठी उपयुक्त ठरणारी महत्वपूर्ण आणि अचूक माहिती संकलित करणे हे आहे. या जनगणनेत सुमारे १२ लाख मत्स्य व्यावसायिक कुटुंबे, ५६८ मत्स्य गावे आणि १७३ मत्स्य उतरण केंद्रांबाबत अचून आणि तत्काळ माहिती संकलित केली जाईल.
सागरी मच्छिमार, मासेमारी गावे आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांबद्दल व्यापक माहिती गोळा करणे हे देखील या जनगणनेचे उद्दिष्ट आहे. प्रथमच आर्थिक स्थिती, विविध उपजिविका आणि शासन योजनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती अत्याधुनिक ऑनलाईन डिजिटल फ्लॅटफॉर्मद्वारे गोळा केली जात आहे.
www.konkantoday.com




