
निवे बुद्रूक गावातील पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीची अवस्था बिकट
संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रूक गावातील पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीची अवस्था बिकट झाली आहे. इमारतीला झाडीझुडुपांनी वेढलेली असून कर्मचार्यांऐवजी सापांचा वावर असल्याचे विदारक चित्र आहे. या इमारतीची साफसफाई करून पशुवैद्यकीय दवाखाना जनतेच्या सेवत दाखल व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. येथे अधिकारी उपस्थित नसल्याचे शेतकर्यांची गैरसोय होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्यांनीही लक्ष देण्याची गरज आहे.
देवरूख-रत्नागिरी मार्गावर निवे बुद्रूक गाव वसलेला आहे. गावागावात पशुधन वाढावे, पशूंची काळजी घेण्याच्या उद्देशाने देवाखाने उभारण्यात आले आहेत. निवे बुदकि येथे बीएसएनएल मनोर्यानजिक दवाखान्याची इमारत आहे. ही इमारत गेली अनेक वर्षे बंदावस्थेत आहे. गावातील शेतकर्यांकडे दुभत्या गाई, म्हशी, शेळ्या, कोंबड्या आहेत. इमारत बंद असल्याने अधिकारी, कर्मचारी देखील फिरकत नाहीत. एखादे जनावर आजारी पडल्यास खाजगी डॉक्टरना बोलावण्यात येते. परिणामी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा पशुवैद्यकीय दवाखाना जनावरांसाठी उपलब्ध व्हावा अशी मागणी होत आहे.
www.konkantoday.com




