
पक्ष, नाव ,चिन्ह चोरी केली,माझे वडीलही चोरायला लागले तेवढं पुरलं नाही आता मत चोरी करायला लागलेत-उद्धव ठाकरे…
महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी १ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईत “सत्याचा मोर्चा” नावाचा एक मोठा संयुक्त निषेध पुकारला आहे. निवडणूक आयोगाच्या “गलिच्छ आणि सदोष” कार्यपद्धतींवर प्रकाश टाकण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाविशेषतः, मतदार यादीतून अंदाजे १ कोटी बनावट किंवा डुप्लिकेट नावे काढून टाकण्याची मागणी ते करत आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी संवाद साधला आहे. त्यांनी विरोधकांवर मोठा घणाघात केला. तर एक त्यांच्या नावाचा आलेला अर्ज दाखवला. यानंतर आता राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुमचं वर्णन काय करायचं? देशभक्त, खऱ्या मतदार बंधू भगिनींनो…. ही विरोधी पक्षाची एकजूट नाही, तर लोकशाहीचं नेतृत्व करणाऱ्या राजकीय पक्षांची एकजूट आहे. आज फक्त ठिणगी बघत आहात, पण या ठिणगीचा वणवा होईल. मतचोरांनो तुमच्या बुडाला आग लावायची ताकद या ठिणगीत आहे. शोलेत एक डायलॉग गाजला… सोजा नहीं तो गब्बर आ जाएगा.. तसं आता जागे व्हा नाहीतर अॅनाकोंडा येईल, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ते म्हणाले की, राजने पुराव्यांचा डोंगर आणला आहे. रोज पुरावे येतायत. तरीही राज्यकर्ते आणि निवडणूक आयोग.. आयोग कसले यांचे नोकरच आहे. अॅनाकोंडाची भूक शमत नाही. पक्ष, नाव चिन्ह चोरी केली. माझे वडील चोरायला लागले आहे. तेवढं पुरलं नाही आता मत चोरी करायला लागलेत. सत्ताधारी आले नाहीत. मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या साक्षीने आव्हान देतो की तुम्ही आमचा पर्दाफाश कराच. करून टाका दूध का दूध पानी का पानी, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण दरवेळी म्हणतो की महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय. आज आपण एकवटलोय आणि हा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवत आहे. पक्ष बाजूला ठेवून आपण एकत्र आलो आहे. शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप, कम्युनिस्ट एकत्र आले आहेत. आपल्या घरात न दिसणारी, परवानगी न घेतलेली माणसं राहतायत का ते बघा. शौचालयात १०० माणसं राहत असतील तर घरात किती राहत असतील, असं म्हणत त्यांनी त्यांच्याच नावाचा एक अर्ज दाखवला.
ते म्हणाले की, उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाच्या माणसाने व्हेरिफिकेशनचा अर्ज केला आहे. तो उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाच्या माणसालाच माहिती नाही. अर्ज कधी केलाय २३ – १० – २०२५. कुठून केलाय तर सक्षम नावाच्या अॅपवरून. हा प्रकार कशासाठी कोण करत होतं. याचा अर्थ असा. माझ्या नावाने खोट्या नंबरवरून ओटीपी काढण्याचा प्रयत्न झाला. कदाचित आपण हा विषय हातात घेतल्यानंतर हा अर्ज केला गेला आहे.
म्हणजे नक्की यात काही डाव आहे. एका पक्षाचा प्रमुख म्हणून प्रचार करतोय, तर साध्या गोष्टी आम्हाला कळत नाही? याचे सर्वर कोणाच्या तरी ऑफिसमध्ये आहे. ही सगळी यंत्रणा यांच्याच हातात आहे. कोणी किती वेळा मतदान करायचं. हे सगळं तेच ठरवतायत. लोकशाहीच्या मार्गाने यांना ठोकायला आम्ही आसुसलो आहोत, असा धक्कादायक खुलासा उद्धव ठाकरेंनी केला आहे.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, घालीन लोटांगण आमच्या आई वडिलांनी शिकवलं नाही, लाचारी आम्ही करत नाही. राज्यातल्या प्रत्येक नागरिकाने मतचोरी करणाऱ्याला लोकशाही मार्गाने फटकवा. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही आहे. कायद्याचा खोटा दंडुका डोक्यात मारलात तर त्या दंडुक्याचं काय करायचं हे ठरवायला राज्यातला नागरिक सक्षम आहे जसजशी निवडणूक येईल तशी यांची दडपशाही सुरू होईल, असं त्यांनी सांगितलं आहे.




