
दाऊद इब्राहीम याचा जवळचा साथीदार दानिश मर्चंट याला मुंबई पोलिसां कडून गोव्यात अटक
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याचा जवळचा व्यक्ती दानिश मर्चंट याला मुंबई पोलिसांनी गोव्यात अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) हणजूण येथून त्याला अटक केली.दानिश मर्चंटला दानिश चिकना म्हणून देखील ओळखले जाते. अमली पदार्थ प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
दानिश चिकना दाऊदचा जवळचा माणूस असून, तो मुंबईती डोंगरी भागात दाऊच्या अमली पदार्थ रॅकेटचा व्यवसाय सांभाळतो. मुंबई पोलिसांनी दानिशला गेल्यावर्षी देखील मुंबईतून अटक केली होती.
२०१९ मध्ये मुबंई पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी पथकाने दाऊदची डोंगरीतील ड्रग फॅक्टरी उद्धवस्त केली होती. यावेळी कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.




