
खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत गुहागरमध्ये अनेकांचे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश

गुहागर शहरातील भाजप, शिवसेना, “आरपीआय”मधील युवक तसेच महिलांनी खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
रोहा (जि. रायगड) येथे झालेल्या या कार्यक्रमात भाजपच्या माजी महिला शहराध्यक्ष नेहा वराडकर, आरपीआयच्या शीतल कदम, युवा सेनेचे सिद्धार्थ वराडकर आणि केदार वराडकर, अनिकेत वराडकर, स्वरुप वराडकर, सर्वेश वराडकर, ओंकार वराडकर, अथर्व वराडकर, आर्यन वराडकर आदींचा पक्षप्रवेश झाला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहिल आरेकर, राष्ट्रवादी काँग्रेस सचिव संतोष जोशी, काँग्रेसचे गुहागरमधील प्रमुख पदाधिकारी श्रीधर बागकर, राष्ट्रवादी काँग्रेस गुहागर शहराध्यक्ष मंदार कचरेकर, दीपक शीरधनकर, वेदांत पडवळ, महिला तालुकाध्यक्ष शलाका काष्टे, वृषाली ठाकरे, सायली आरेकर आदी उपस्थित होते.




