
राजीवडा खाडीमुखाजवळील गाळ प्रश्न मिटणार -उदय सामंत
रत्नागिरी शहरांतील राजीवडा खाडीमुखाजवळच्या मच्छीमारांना भेडसावणार्या गाळाचा प्रश्न लवकरच निकाली काढला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक निधी मंजूर केला आहे. या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. आताही आपण राजीवडा, मिरकरवाडा, कर्ला आदी भागांमध्ये कोट्यवधीची विकासकामे केली आहेत. आतातरी कोणत्याही ’फेक नरेटिव्ह’ला बळी न पडता शिवसेनेच्या आपल्यासाठी झटणार्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन मंत्री सामंत यांनी केले.
राजीवड्यात विविध विकासकामांचा शुभारंभ श्रीफळ वाढवून त्यांच्या हस्ते करण्यात आला. मच्छीमार्केटपासूनचे राजीवड्यातील विविध रस्त्यांचा व अन्य कामांचा यात समावेश आहे. यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदेश मयेकर, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, उपशहरप्रमुख विजय खेडेकर, माजी नगरसेवक सोहेल मुकादम, मुसा काझी, बाळू साळवी, दिशा साळवी, उमर मुल्ला, आदिल फणसोपकर, एम. सईद फणसोपकर, तन्वीर जमादार, ताहीर मुल्ला, मुनाफ कादरी, योगेंद्र चव्हाण, शिल्पा हळदणकर, रफिक कोतवडेकर यांच्यासह राजीवड्यातील अनेक पदाधिकारी का ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी सोहेल मुकादम यांनी सांगितले की, राजीवडा येथील काही भागातील रस्ते अगदीच छोटे आहेत. त्यासाठी सामंत यांच्या सूचनेवरुन रस्त्याच्या बाजूने अग्नीशमन यंत्रणेची पाईपलाईन बसवली जाणार असून गल्ल्यांच्या बाजूने व्हॉल्व ठेवले जाणार आहेत. एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार सामंत यांनी केल्याचेही मुकादम यांनी सांगितले. कार्यक्रमापूर्वी सामंत यांनी राजीवडा येथील काशीविश्वेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी मंदिराच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कैलास विलणकर, देवेंद्र झापडेकर व विश्वस्त उपस्थित होते.www.konkantoday.com




