
रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या इमारतीच्या नूतनीकरण कार्याचा शुभारंभ ३१ ऑक्टोबर रोजी
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या इमारतीच्या नूतनीकरण कार्याचा शुभारंभ शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) रोजी सकाळी ९.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील आयोगाच्या इमारतीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे उद्योगमंत्री व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नूतनीकरण कार्याचा शुभारंभ होणार आहे.
या कार्यक्रमास रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे आणि रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष सौ. इंदुमती मलुष्टे-कोल्हापुरे यांची प्रमुख अतिथींची उपस्थिती लाभणार आहे.
ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे कार्यालय अधिक सुबक, सुसज्ज व कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने हा नूतनीकरण उपक्रम राबविण्यात येत आहे. या कामामुळे नागरिकांना तक्रार नोंदविणे आणि त्यावर तत्पर निर्णय मिळविणे अधिक सोयीस्कर होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या समारंभाचे आयोजन रत्नागिरी बार असोसिएशन, रत्नागिरी तर्फे करण्यात आले असून ॲड. रत्नदीप चाचले, सचिव, रत्नागिरी बार असोसिएशन यांनी सर्व नागरिकांना व मान्यवरांना उपस्थित राहण्याचे सप्रेम आवाहन केले आहे.




