
रत्नागिरीत व्हॉलीबॉल निवड चाचणी २ नोव्हेंबर रोजी
रत्नागिरी : सांगली येथे होणाऱ्या सिनियर इंटर-डिस्ट्रिक्ट स्टेट व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप २०२५ (पुरुष व महिला) या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा संघाची निवड चाचणी आगामी २ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
ही निवड चाचणी सध्या सुरू असलेल्या खालचा फगरवठार येथील यंग बॉईज ग्रुप मैदानावर पार पडणार असून, सकाळी ८:३० वाजता या चाचणीला सुरुवात होईल.
संघ निवडीसाठी जिल्ह्यातील सर्व इच्छुक खेळाडूंनी व क्रीडाप्रेमींनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिकच्या माहितीसाठी प्रफुल्ल वायंगणकर 8329058938 या क्रमांकावर संपर्क साधावा.
या निवड चाचणीच्या माध्यमातून जिल्हा पातळीवरच्या सर्वोत्तम खेळाडूंची निवड करून रत्नागिरीचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे.



