
देवरूख नजीकच्या साडवली सप्तलिंगीनगर येथील भरवस्तीतील पाच बंद घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना
देवरूख नजीकच्या साडवली सप्तलिंगीनगर येथील भरवस्तीतील पाच बंद घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना शनिवारी व सोमवारी उघडकीस आली आहे. सीसीटीव्हीत हे चोरटे कैद झाले आहेत. याच परिसरातून एक दुचाकीही चोरीला गेली आहे.ऐन दिवाळीच्या सणात भरवस्तीत चोरीची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या चोरट्यांचा शोध घेणे, हे देवरूख पोलिसांसमोर आव्हान आहे.
देवरूख-संगमेश्वर मुख्य मार्गालगत साडवली सप्तलिंगीनगर आहे. चोरट्यांनी फोडलेली बंद घरे ही या मुख्य मार्गापासून 100 ते 200 मीटर अंतरावर आहेत. आनंद बोंद्रे, विश्वनाथ जवरत, सुजित जाधव हे दिवाळी सुट्टी असल्याने घराला कुलूप लावून गुरुवारी बाहेर गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी शुक्रवारी रात्री ही बंद घरे फोडली. बोंद्रे व जवरत यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. तर सुजित जाधव यांच्या दुचाकीची नंबर प्लेट काढून टाकली. जाधव यांच्याकडे राहणार्या भाडेकरूच्या दरवाजाचे कुलूप तोडले. रमेश गोताड यांची दुचाकी (एमएच 08 एझेड 3080) चोरट्यांनी लंपास केली आहे; मात्र जवरत यांच्या घरासमोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात हे तिन्ही चोरटे कैद झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी डाव साधला. याची माहिती मिळताच देवरूख पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
दरम्यान, शनिवारी तीन बंद घरे फोडल्याचा प्रकार समोर आला असतानाच, सोमवारीही याच परिसरातील दोन बंद घरे फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजाराम घाग यांचे हे घर असून श्री. गराटे व श्री. महाजन हे दोघे तेथे भाडेकरू आहेत. भरवस्तीत एकूण पाच बंद घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले




