
राजापुरातून तिघेजण बेपत्ता
रत्नागिरी, दि. 27 ) : राजापूर तालुक्यातील तीन नागरिक गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता असून, त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. नागरिकांनी संबंधित व्यक्तींविषयी कोणतीही माहिती असल्यास ती जवळच्या पोलिस ठाण्यात कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्रीमती सरस्वती जयराम लाड वय ७० राहणार हसोळतळी, लाडवाडी ता.राजापूर या त्यांच्या राहते घरातुन दिनांक १ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.३० वा.च्या दरम्याने हसोळतळी लाडवाडी ता.राजापूर जि. रत्नागिरी येथून नापत्ता झाल्या आहेत. त्यांची उंची ४ फुट ५ इंच, रंग गोरा, केस काळे पांढरे, बांधा-मध्यम, अंगात गुलाबी रंगाची नऊवारी साडी व गुलाबी रंगाच ब्लाऊज, गळ्यात काळ्या रंगाचा दोरा, उजव्या हाताच्या मनगटावर काळा डाग असे आहे.
सुभाष यशवंत सौंदळकर वय-38 रा. आंगले सौंदळकरवाडी, ता.राजापूर हे ९ ऑगस्ट २०२४ रोजी ९ च्या दरम्याने आंगले सौंदळकरवाडी ता.राजापुर येथील त्यांच्या राहते घरातुन नापत्ता झाले आहेत. शिक्षण- 10 वी ,जात-हिंदु कुणबी अंगाने – सडपातळ, चहेरा – उभट, उंची ५ फुट ८ इंच, रंग – सावळा, केस विरळ दाढी मिशी वाढलेली, अंगात राखाडी रंगाचे हाफ हाताचे टि शर्ट व राखाडी रंगाची हाफ पॅन्ट व पायात चप्पल, जवळपास मोबाईल नाही, भाषा मराठी, दारु पिण्याची सवय.
पांडुरंग संभु सरवणकर वय ८६ वर्षे रा.मु.पो.केळवली खालची हर्याण वाडी, ता. राजापुर हे दि.२९ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वा. चे नंतर राहते घरातुन नापत्ता झाले आहेत. वर्ण – सावळा, उंची ५ फुट ६ इंच, केस बारीक पिकलेले, दाढी पिकलेली, चेहरा उभट, दात पडलेले, अंगात हाफ सफेद रंगाचे टि शर्ट व नेसणीस सफेद रंगाची फुल पँन्ट, पायात रेग्युलर चप्पल, हातात गोल्डन मनगटी घड्याळ, किशात आधार कार्ड आहे.
000




