
राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी रत्नागिरीतील भार्गवी पवार, योगराज पवार यांची निवड
रत्नागिरी : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित कर्नाटका तायक्वांदो असोसिएशन यांच्या सहकार्याने ४२ वी राष्ट्रीय तायक्वांदो ज्युनियर क्युरुगी पूमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२५ ही स्पर्धा कोरमंगलम इनडोअर स्टेडियम बेंगलोर (कर्नाटक) येते ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र तायक्वांदो संघात रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन या जिल्हा संघटनेतील युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटरचे विद्यार्थी भार्गवी सत्यविजय पवार आणि योगराज सत्यविजय पवार या दोन खेळाडूंची पूमसे प्रकारातून निवड झाली आहे. २९ ऑक्टोबर रोजी रत्नागिरीतून संघ रवाना होणार आहे. पूमसे प्रकारात रत्नागिरी जिल्ह्यातून प्रथमच दोन खेळाडू ज्युनियर राष्ट्रीय पूमसे स्पर्धेत सहभाग झाल्याने जिल्हाभरातून योगराज आणि भार्गवी यांचे कौतुक होत आहे.
या दोन्ही खेळाडूंनी अनेक जिल्हा राज्य राष्ट्रीय स्पर्धेत पदक पटकावले असून यापूर्वी सीबीएससी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत क्युरुगी फाईट स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. दोन्ही खेळाडूंना वडील सत्यविजय पवार व आई सुस्मिता पवार यांचे प्रोत्साहन व मुख्य प्रशिक्षक राम कररा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले पूमसे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत पूमसेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याने तृतीय क्रमांकाचे चषक संपादन केल्याने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, सदस्य अजित गार्गे, धुलीछंद मेश्राम, खेमसकर शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार व्यंकटेश्वर कररा, उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते संजय सुर्वे, राकेश जाधव, मयूर खेतले, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये व युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर साळवी स्टॉप सर्व पदाधिकारी ओम साई मित्र मंडळ नाचणे सर्व पदाधिकारी , कै. अन्नपूर्णा संगीत कला विद्यालयचे अध्यक्ष अनंत आगाशे, गौरंग आगाशे, सौ. दीप्ती आगाशे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या खेळाडूचे संघ प्रशिक्षक म्हणून महिला प्रशिक्षिका सौ. शशीरेखा कररा या काम पाहणार आहेत.




