
तिसर्या आठवड्यातही स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवणार
कोकण रेल्वेने विशेष मोहीम ५० द्वारे स्वच्छता आणि शाश्वततेसाठी वचनबद्धता सुरू ठेवली असून तिसर्या आठवड्यातही प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. कोकण रेल्वे केंद्रीत उपक्रम, जागरूकता मोहीम आणि सामुदायिक सहभागाद्वारे मोहिमेला आणखी गती देण्यात येणार असून याद्वारे पर्यावरणीय जबाबदारी आणि जनजागृती या प्रतिबद्धतेला बळकटी देण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी दिली.
मडगाव येथे स्वच्छता राखण्यासाठी व स्वच्छ शिक्षण वातावरण वाढवण्यासाठी आयोजित स्वच्छता मोहिमेत केआरसीएलची स्वच्छ, हरित भविष्यासाठी वचनबद्धता प्रतिबिंबित करण्यात आली. चिपळूण स्थानकावर कर्मचारी व स्वयंसेवकांनी विशेष मोहीम ५० अंतर्गत स्वच्छता मोहिमेत भाग घेत छोट्या कृती, मोठा परिणाम हा संदेश देण्यात आला. कोकण रेल्वेने उड्डपी येथील रामकृष्ण हेगडे कौशल्य विकास केंद्रात एक सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण सत्रात कोटिचेन्नय्या प्री-आर्मी ट्रेनिंग स्कूल, हनेहल्ली गाव, बारकुर येथील विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला.
www.konkantoday.com



