
भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृती सप्ताह २७ पासून
लाचलुचपत विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कालावधीत लाचलुचपत विभाग रत्नागिरीच्यावतीने जिल्ह्यातील ग्रामपंचायत, रिक्षा संघटना, व्यापारी संघटना येथे भ्रष्टाचार निर्मूलन बैठका, शाळा व महाविद्यालयामध्ये व्याख्यान, चर्चासत्र, निबंध स्पर्धा, पथनाट्य, योगा वर्ग, व्यायामशाळा, ज्येष्ठ नागरिकांचे चर्चासत्र आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन लाचलुचपत विभाग रत्नागिरीच्यावतीने करण्यात आले आहे.
www.konkantoday.com




