
भातकापणीसाठी मजूर टंचाई
परतीचा पाऊस वेळी-अवेळी बरसत असतानाच जिल्ह्यात भातकापणीला वेग आला आहे. काही ठिकाणी शेतकर्यांनी पावसाच्या उघडीनंतर लगेचच झोडणीची कामे सुरू केली आहेत. मात्र, या कामांसाठी आवश्यक मजुरांची मोठी टंचाई निर्माण झाली असून, शेतकर्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे.
पावसाचा अंदाज अनिश्चित असल्याने शेतकरी आभाळातील प्रत्येक उघड झोत साधत कापणीची गडबड करत आहेत. एकाच वेळेस अनेक शेतांमध्ये काम सुरू झाल्याने मजुरांची मागणी अचानक वाढली आहे. परिणामी मजुरीदर झपाट्याने वाढले असून, सध्या एका मजुराचा दिवसाचा दर ५०० ते ७०० रुपये इतका पोहोचला आहे.www.konkantoday.com




