
श्रीक्षेत्र आळंदी येथे भक्तनिवास व महाद्वार ते पुंडलिक मंदिर घाट सुशोभिकरणाच्या भूमिपूजनाचा भव्य सोहळा
श्रीक्षेत्र आळंदी येथे भक्तनिवास व महाद्वार ते पुंडलिक मंदिर घाट सुशोभिकरणाच्या भूमिपूजनाचा भव्य सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत उपस्थित होते.
त्यासमयी बोलताना, या पवित्र भूमीवर उपस्थित राहण्याचा आज आम्हा सर्वांना मनापासून आनंद झाला. मा. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मंत्री म्हणून काम करण्याची संधी लाभली आणि आज त्यांच्या प्रेरणेतून ज्ञानेश्वरी प्रकाशनाचे कार्यसाकार झाले.
आळंदी देवस्थानमार्फत सगळ्यात स्वस्त दरात उपलब्ध होणारी ज्ञानेश्वरी मराठी भाषेवर आणि संत ज्ञानेश्वरांवर प्रेम करणाऱ्या जनतेपर्यंत पोहोचवता आली, याचा मला विशेष अभिमान आहे. मराठी भाषेचा मंत्री म्हणून हा निधी उपलब्ध करून देता आला, हे माझं भाग्य आहे. मात्र त्याहून हजार पटीने हे श्रेय मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचेच आहे — कारण त्यांनीच मला मराठी भाषेचा मंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी दिली.
मा.शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्रात गोमातेला ‘राज्यमाता’चा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. गोसंवर्धनासाठी आपली सर्वांची बांधिलकी पुन्हा दृढ करण्याचा निर्धार आज या प्रसंगी करत आहे.
आळंदी देवस्थानने महाराष्ट्र शासनाच्या निधीचा उपयोग करून तीन महिन्यांच्या आत ज्ञानेश्वरी प्रकाशनाची अंमलबजावणी केली, हे त्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुकास्पद उदाहरण आहे, असे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.
यावेळी मा. नीलमताई गोऱ्हे (उपसभापती, विधान परिषद), मा. मंत्री भरतशेठ गोगावले, अक्षय महाराज भोसले, ह.भ.प. श्री चैतन्य महाराज लोंढे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ, पुरुषोत्तम पाटील, रोहिणीताई पवार आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने बंधू व भगिनी उपस्थित होते.




