
रेल्वे भरतीत कोकणातील तरुणांना संधी न मिळाल्यास परप्रांतीय परप्रांतीयः गाड्या धावू देणार नाही : शौकत भाई मुकादम
भारतीय रेल्वेमध्ये हजारो पदांसाठी लवकरच मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मात्र या भरती प्रक्रियेत मध्य कोकणातील बेरोजगार तरुणांना संधी न दिल्यास, परप्रांतीय रेल्वे गाड्या कोकण रेल्वे मार्गावर धावू देणार नाही, असा इशारा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी दिला आहे.
शौकतभाई मुकादम म्हणाले की, भारतीय रेल्वे प्रशासनाने कोकणातील तरुणांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू. कोकणातून जाणार्या गाड्या रोखून धरल्या जातील. त्यांनी पुढे सांगितल की, रेल्वे भरतीसाठी घेण्यात येणार्या परीक्षांचे केंद्र महाराष्ट्रात असावे. सध्या अनेक वेळा इतर राज्यांमध्ये परीक्षा घेतल्या जातात, ज्यामुळे कोकणातील व महाराष्ट्रातील उमेदवारांवर अन्याय होतो. गेल्या अनेक वर्षांपासून हे अन्यायकारक चित्र मक आहे: परंतु आता आमा करणार नाही, असे मुकादम यांनी स्पष्ट केले. कोकणातील बेरोजगार तरुणांच्या संधीसाठी रेल्वे गासनाने सकारात्मक निर्णय यावा, अशी मागणीही त्यांनी या प्रसंगी केली.www.konkantoday.com




