
मुंबईतील विधान भवन जवळ झाडावर चढून एका व्यक्तीचे अजब आंदोलन, पोलीस यंत्रणेची धावपळ

आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी अनेक जण आंदोलनाचा मार्ग स्वीकारतात मात्र मुंबईत एका व्यक्तीने आंदोलनासाठी अजब मार्ग स्वीकारला आहे त्याने आंदोलनासाठी चक्क उंच झाडाची निवड केली आहे
मुंबईतील विधानभवनाच्या शेजारी एका व्यक्तीने झाडावर चढून आंदोलन सुरू केले आहे या व्यक्तीच्या आंदोलनाचा पत्ता लागताच पोलिस यंत्रणेची धावपळ उडाली
व्यक्तीला खाली उतरवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला
तसेच अग्निशमन दलाच्या गाड्या देखील विधानभवनाच्या समोर दाखल झाले असून या व्यक्तीला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत
एका तासापेक्षा अधिक काळ या व्यक्तीने हे अजब आंदोलन सुरू केले आहे




